धक्कादायक : नांदेडकरांनो सावधान, हत्तीरोगाने जिल्ह्यात पाय पसरले !(Elephantiasis)

जिल्ह्यात आहेत तीन हजार 299 रुग्ण

नांदेड : हत्तीरोग म्हणजे पाय हत्तीसारखा होणे, त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी डिईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची मात्रा घ्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृध्दीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आहेत. (Elephantiasis

 

 

Elephantiasis is when the legs become like elephants, so you need to take DEC and albendazole tablets to protect yourself from them. Shockingly, according to the Elephant Disease Search Campaign Report from 15 to 31 August 2020, there are a total of 3,299 externally symptomatic patients with 746 eggs and 2,553 elephantiasis in the district.
हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे घरोघरी जावून डिईसी (DEC) व अलबेंडाझॉल (Albendazole) गोळयाची एक मात्रा खाऊ घालणार आहेत.  जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Elephantiasis
नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त असून नागरिकांना या आजाराचा धोका होवू नये म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्ह्यात सन 2004 पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवशीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृध्दीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणेयुक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने जिल्ह्यात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधौपचार देण्यात येत नाही. (Elephantiasis)

 

डिईसी व अलबेंडाझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका व इतर स्वयंसेवक 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान प्रत्येकांच्या घरी जात आहेत. नागरिकांनी या गोळया जेवण करुन कर्मचाऱ्यासमक्ष घेवून शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे. (Elephantiasis) 

Local ad 1