सकारात्मक बातमी : (Corona free) कोरोनामुक्तीचा दर 96.51 टक्क्यांवर
नांदेड : नांदेडसह राज्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे अधिक प्रमाण आहे. सध्या कोरोना बरे होण्याचे प्रमाण 96.51 वर पोहोचले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, सोमवारनंतर सर्व व्यवाहर सुरु होणार आहेत. त्यात मास्क, सोशल डिस्टेंसिंग आणि सॅनिटायर वापरणे आवश्यक आहे. (Corona free)
नांदेड जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.5 मे) एकुण बाधितांची संख्या 90 हजार 262 एवढी झाली असून यातील 87 हजार 120 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 742 सक्रीय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार घेत असून 17 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Corona free)
कोरोनाची संक्षिप्त माहिती.