नांदेड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत मुलींचा डंका
इयत्ता बारावीचा नांदेड जिल्ह्याचा 88.56 टक्के निकाल
नांदेड : इयत्ता बारावीचा राज्याचा निकाल हा 91.25 टक्के एवढा आहे. त्यामध्ये लातूर विभागाचा निकाल 90.37 टक्के तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 88.56 निकाल।लागल्याची माहिती नांदेड शिक्षण विभागाने दिली आहे. (Nanded district, girls Rocks in the 12th examination)
Maharashtra Board HSC Results 2023 live । बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा 91 टक्के निकाल
लातूर विभागात नांदेड जिल्ह्यात एकूण 38 हजार 928 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी 38 हजार 276 एवढे विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. त्यापैकी 33 हजार 901 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 88.56% एवढे आहे. (Nanded district, girls Rocks in the 12th examination)
या परीक्षेमध्ये एकूण 21 हजार 135 मुले हे प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 17 हजार 986 म्हणजेच 85.10 टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 17,) हजार 048 मुलींपैकी 15 हजार 834 मुली या पास झालेले आहेत म्हणजेच 92.81 टक्के एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. (Nanded district, girls Rocks in the 12th examination)
मुलींचा डंका
नांदेड जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल पंचायत 95.78 टक्के आहे तर कला शाखेचा निकाल 19.41 टक्के आहे वाणिज्य शाखेचा निकाल 88.69 टक्के लाच लागला आहे.