नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस वादळी वारा, पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी वर्तविला आहे. या काळात नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Nanded district forecast for three days of rain with gale force winds)
Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषदेत मोठी पदभरती होणार ; अभ्यासक्रम, पॅटर्न झेडपीच ठरविणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दि.29 व 30 एप्रिल व दि.1 मे 2023 या 3 दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची व विजेच्या कडकडाटासह – ढगांच्या गड़गडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तेंव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनीखबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (Nanded district forecast for three days of rain with gale force winds)
या गोष्टी टाळा..
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लंडलाइन. फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तमेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तन्मध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूच्या उंच मनोज्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उबड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे (Nanded Resident Deputy Collector Santoshi Devkule) यांनी केले आहे. (district forecast for three days of rain with gale force wind)
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, कापूस बियाणे घेताना काय काळजी घेतली पाहिजे
अशी घ्या काळजी..
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घध्या.घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून टूर रहा. पाण्यात उभ असाल तर तात्काळ पाण्यातून बाहर पडा. (district forecast for three days of rain with gale force wind)