...

(covid new cases rajistar) नांदेड जिल्ह्यात 212 नवीन कोरोना रुग्णांची भर

नांदेड : जिल्ह्यात  212 नविन कोरोना बाधित आढळले असून, त्यात  आरटीपीसीआर तपासणीद्वारे 97 तर अँटिजेन तपासणीद्वारे प्राप्त 115 अहवालांचा समावेश आहे . जिल्ह्यात  एकुण बाधितांची संख्या 88 हजार 626 एवढी झाली असून यातील 84 हजार 724 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 585 रुग्ण उपचार घेत असून 61 बाधितांची प्रकृती  अतिगंभीर आहे.  (212 covid new cases rajistar)

भगवती कोविड रुग्णालयात तुळशीरामनगर नांदेड येथील 63 वर्षाची महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हडको नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 15 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पिरपुर्‍हाननगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष तर 26 मे रोजी देगलूर कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील उंदरी येथील 70 वर्षाची महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 868 एवढी आहे.  (212 covid new cases rajistar)

ा बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 45, धर्माबाद 3, लोहा 3, उमरी 5, नांदेड ग्रामीण 10, हदगाव 6, माहूर 5, यवतमाळ 1, अर्धापूर 2, कंधार 2, मुदखेड 2, लातूर 1, बिलोली 1, किनवट 4, मुखेड 5, परभणी 2 तर न्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 34, बिलोली 1, किनवट 4, मुखेड 8, औरंगाबाद 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 10,धर्माबाद 1, लोहा 9, नायगाव 1, लातूर 1, अर्धापूर 6, हदगाव 7, माहूर 9, उमरी 5, परभणी 1, भोकर 3, कंधार 8, मुदखेड 2, अहमदनगर 1, यवतमाळ 1 असे एकूण 212 बाधित आढळले.  (212 covid new cases rajistar)

जिल्ह्यातील 225 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, उमरी कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुगणाय 8, अर्धापूर तालुक्यांतर्गत 5, लोहा तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, मुदखेड कोविड केअर सेंटर 5, कंधार तालुक्यांतर्गत 7, नायगाव तालुक्यांतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 7, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, बारड कोविड केअर सेंटर 2, हिमायतननगर तालुक्यातर्गंत 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, माहूर तालुक्यांतर्गत 7 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (covid new cases rajistar)

जिल्ह्यात 1 हजार 585 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 49, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 41, बारड कोविड केअर सेंटर 10, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 11, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 6, कंधार कोविड केअर सेंटर 3,  नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 4, माहूर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 7,

लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर 18, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 14, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 385, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 681, खाजगी रुग्णालय 206 व्यक्ती उपचार घेत आहेत.

Local ad 1