(vaccine update) नांदेड जिल्ह्यातील साडेचार लाख नागरिक झाले “लसवंत”
नांदेड : नांदेड जिल्ह्यात शनिवारपर्यंत (5 जून) कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 25 हजार 700 डोस असे एकुण 5 लाख 53 हजार 30 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 4 लाख 42 हजार 108 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सोमवारी जिल्ह्यातील 92 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. (nanded corona vaccine update)
जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरणासाठी लस सर्वत्र विभागून देण्यात आली. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 7 जून रोजी लसीकरण केंद्रावर मनपाक्षेत्रातील 8 केंद्रावर लसीचे डोसउपलब्ध करुन दिले आहेत. nanded corona vaccine update
या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी,कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. याव्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय 20 डोस, दशमेश हॉस्पीटल 20 डोस, सिडको 20 डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय 10डोस, हैदरबाग 10 डोस या केंद्रावर उपलब्ध आहेत. nanded corona vaccine update
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर,कंधार, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड,नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचेप्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसउपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड,ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार,मांडवी, लोहा, माहूर,मुदखेड, नायगाव व उमरी या 15 केंद्रावरकोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय बारड 30 डोस उपलब्ध करुनदेण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत.