Nanded corona update। जिल्ह्यात आज आढळले तीन कोरोना बाधित
नांदेड Nanded corona update : रविवारी प्राप्त झालेल्या 623 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर (Rt pcr test) तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन (Antigen test) तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. शनिवारी एकही एकही बाधित आढळला नव्हता.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण बाधितांची संख्या 90 हजार 308 एवढी झाली असून यातील 87 हजार 628 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 28 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Nanded corona update)