(nanded corona update today) नांदेड जिल्ह्यात मंगळवारी 552 रुग्णांची भर (552 patients added in Nanded district on Tuesday)
नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होण्याचे नाव घखेत नाही. मंगळवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 70 अहवालापैकी 552 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 275 तर अँटिजेन तपासणीद्वारे 277 अहवाल आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 27 हजार 923 एवढी झाली आहे. (552 patients added in Nanded district on Tuesday)
मंगळवारी नाईकनगर नांदेड येथील 46 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 618 एवढी झाली आहे. (552 patients added in Nanded district on Tuesday)
जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 27 हजार 923 एवढी झाली असून यातील 24 हजार 112 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. एकुण 2 हजार 971 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून, त्यातील 60 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 208, देगलूर तालुक्यात 1, हिमायतनगर 1, किनवट 3, मुदखेड 2, नायगाव 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 11, हदगाव 12, कंधार 2, लोहा 19, मुखेड 12, जालना 2 असे एकूण 275 बाधित आढळले. (552 patients added in Nanded district on Tuesday)
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 174, अर्धापूर तालुक्यात 11, बिलोली 4, हदगाव 4, कंधार 3, लोहा 15, नायगाव 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, भोकर 1, देगलूर 30, हिमायतनगर 10, किनवट 8, मुदखेड 1, औरंगाबाद 1, हिंगोली 1 असे एकूण 277 बाधित आढळले. (552 patients added in Nanded district on Tuesday)