...

(corona patient discharge) नांदेड जिल्ह्यात 574 कोरोना बाधितांना डिस्चार्ज

नांदेड : जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 169 अहवालापैकी 163 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर अँटिजेन तपासणीद्वारे 53 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 266 एवढी झाली असून यातील 82 हजार 492 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. (corona patient discharge)

जिल्ह्यात 2 हजार 560 रुग्ण उपचार घेत असून 111 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.दिनांक 17 व 18 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 824 एवढी झाली आहे. (corona patient discharge)

जिल्ह्यातील 574 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 14, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 301, मुखेड कोविड रुग्णालय 15, धर्माबाद तालुक्यातंर्गत 6, अर्धापूर तालुक्यातंर्गत 5, कंधार तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, बारड कोविड केअर सेंटर 9, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, माहूर तालुक्यांतर्गत 2, बिलोली तालुक्यांतर्गत 35, उमरी तालुक्यांतर्गत 3, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 6, देगलूर कोविड रुग्णालय 3, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 19, हदगाव 10, लोहा तालुक्यांतर्गत 12, खाजगी रुग्णालय 106 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (corona patient discharge)

Local ad 1