Nanded corona update : खळबळजनक ः नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ
नांदेड Nanded news : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 692 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. (Nanded corona update )
जिल्ह्यात 32 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, माहूर तालुक्यांतर्गत 1, धर्माबाद 3 असे एकुण 9 बाधित आढळले.