...

Nanded corona update : खळबळजनक ः नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ

नांदेड Nanded news  : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 692 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. (Nanded corona update )

 

जिल्ह्यात 32 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, माहूर तालुक्यांतर्गत 1, धर्माबाद 3 असे एकुण 9 बाधित आढळले.

 

जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 3, मनपा अंतर्गंत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 4 असे एकुण 7 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (Nanded corona update )

Local ad 1