...

नांदेड काॅपीमुक्त पॅटर्न काय आहे?, त्याचा निकालावर काय परिणाम झाला? कोणी राबविले, जाणून घ्या..

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाचा नांदेड पॅटर्न राबविण्याचा निर्णय (Nanded copy free pattern) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता नांदेड काॅपीमुक्त अभियान काय आहे, याची चर्चा सुरु झाली. त्याबरोबरच हे अभियान कोणी राबविले, त्याचे काय परिणाम झाले, याची चर्चा होत आहे.

 

नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम हे अभियान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचे सचिव डाॅ. श्रीकर परदेशी (Dr. Shrikar Pardeshi) यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी असताना २००९ मध्ये हा पॅटर्न राबविला होता. परंतु मधल्या काळात हे अभियान बासणात गुंडाळण्यात आले. परंतु पुन्हा एकदा काॅपीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याविषयी घेतलेला आढावा… (What is Nanded copy free pattern?, how did it affect the result?)

 

 

कॉपीमुक्त परीक्षांसाठी आधी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण संस्थाचालकांच्या कार्यशाळा घेण्यात येतील. जिल्हा दक्षता समितीमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदींचा समावेश असेल. पालकांशी ही संवाद साधला जाईल. परीक्षा केंद्रापासून ५० मीटरपर्यंत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही, परीक्षा केंद्रांचे अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि सर्वसाधारण असे वर्गीकरण, परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करणे, १०० विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती, पोलिस पाटील, कोतवाल, शाळा कर्मचाऱ्यांकडून मुलांची तर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेतील महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी अशा उपाययोजना करण्यातआल्या होत्या. या प्रमाणाचे अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (What is Nanded copy free pattern?, how did it affect the result?)

 

‘कॉपीमुक्त अभियान’ राबवून नवा पुणे पॅटर्न करावा : विभागीय आयुक्त सौरभ राव

अंमलबजावणी काटेकोरपणे झाली..

राज्याच्या अनेक भागांत दहावी-बारावीच्या परीक्षेत सर्रास कॉपी होत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील परिक्षा केंद्रांवर होते. त्याठिकाणी काही शिक्षक किंवा बाहेरची मंडळीच कॉपी पुरवतात, असे चित्र होते. हा प्रकार रोखण्यासाठी नांदेडमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविला. त्यात प्रत्येक परीक्षा केंदांवर ४-५ अधिका-यांचे बैठे पथक त्यांनी नेमले आणि केंदाच्या दोनशे मीटरच्या परिघात फक्त परीक्षार्थींना प्रवेश दिला. अशा प्रकारे काटेकोर अंमलबजावणी केल्याने कॉपी आणि अन्य गैरप्रकार थांबले.

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल : पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, निवडणूक आयोगावर टिकास्त्र

 

निकालाचा टक्का घसरला..

कॉपीमुक्त अभियान राबविल्याने निकाल कमी झाला. बारावीचा निकाल ८२ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर, तर दहावीचा निकाल ८९ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांवर आला होता. त्यानंतर दहावी आणि बारावीच्या सर्व विषयांच्या परीक्षेसाठी सर्व केंदांवर नांदेड पॅटर्न राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. काही वर्षे हा पॅटर्न राबविण्यात आल्याने गुणवत्तेत वाढ झाल्याचे निरीक्षण ही नोंदविण्यात आले होते. (What is Nanded copy free pattern?, how did it affect the result?)

Local ad 1