नंदुरबार हिमालयन ताहर्सवर नांदेड चांबल चॅलेंजर्सची मात

पुणे : नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध नंदुरबार हिमालयन ताहर्स अशी लढत झाली. दोन्ही संघ एकमेकांनाचे मागील 2-3 वर्षांपासून टक्कर प्रतिस्पर्धी आहेत. नंदुरबार संघाने आक्रमक सुरुवात करत पहिल्या 4 मिनिटातच नांदेड संघावर लोन पडत 9-1 अशी आघाडी मिळवली. तेजस कालभोरच्या चतुरस्त्र चढाया समोर नांदेड संघाची बचावफळी संघर्ष करत होती. (Nanded Chambal Challengers win over Nandurbar Himalayan Tahrs)

 

 

 

 

 

मध्यंतरा नंतर तेजस काळभोर सुपर टेन करत तर अतुल राठोड याने चांगल्या पकडी करत संघाची पिझाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. काटे की टक्कर झालेल्या लढतीत अखेर नांदेड संघाने 36-34 असा विजय मिळवला.  (Nanded Chambal Challengers win over Nandurbar Himalayan Tahrs)

 

 

नांदेड संघाकडून अक्षय सूर्यवंशी ने सर्वाधिक 13 गुण मिळवले तर अजित चव्हाण ने 8 गुण मिळवत चांगली साथ दिली. नंदुरबार संघाकडून ओमकार गाडे ने अष्टपैलू खेळ केला तर तेजस काळभोर चांगला खेळ करत सुपर टेन पूर्ण केला.  (Nanded Chambal Challengers win over Nandurbar Himalayan Tahrs)

बेस्ट रेडर– अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर्स– प्रणय चांदेरे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल– अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स

Local ad 1