(Nanded breaking news) जिल्ह्यातील 94 केंद्रावर होणार लसीकरण
नांदेड : जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. (Nanded breaking news) कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना तर कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. (Vaccination will be done at 94 centers in the district)
मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत. (Nanded breaking news)
या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या 11 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. या ठिकाणी 18 ते 44 वयोगट व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.