(Blocked the corona) नांदेडमधील 271 गावांनी कोरोनाला रोखले गावाबाहेरच
नांदेड : जिल्ह्यातील 1 हजार 604 गावांपैकी 1 हजार 450 खेड्यांनी कोरोनाला केले हद्दपार केले आहे. तर 271 गावांनी कोरोनाला गावच्या बाहेरच रोखले (corona break) आहे. त्यात सर्वाधिक 77 गावे किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल हदगाव 42, कंधार 39, लोहा 22, भोकर 16, माहूर 17, मुदखेड 15, नांदेड 12, हिमायतनगर 9, देगलूर 7, अर्धापूर 4, धर्माबाद 4, उमरी 4, मुखेड 2 व बिलोली 1 अशी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. (271 villages in Nanded blocked the corona just outside the village)
कोरोनाची पहिला लाट ही शहारापुर्ती मर्यादीत होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहचला आहे. ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या त्रीसुत्रीचा गावपातळवीर अंमल व्हावा यासाठी भरीव योगदान राहिले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व यंत्रणा पुर्ण सक्षमतेने कार्यरत राहिल्यामुळे जिल्ह्याला हे यश साध्य करता आले. कोरोनाचे आव्हान अजून संपले नसून खेड्यातील लोकांसह ग्रामपंचायतींनी गाफिल न राहता अधिक जबाबदारीने यापुढे दक्षता घेतली तर नांदेड जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण जिल्हा असेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला.
नायगाव तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीने लसीकरणाच्याबाबतीत आपला अपूर्व ठसा उमटविला आहे. या गावात 45 वय वर्षे वयावरील 528 व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष निर्धारित केले होते. या दिलेल्या लक्षाची 100 टक्के पूर्ती करुन या खेड्याने लसीकरणाला नवा विश्वास दिला. भोकर तालुक्यातील भोसी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या आव्हानावर यशस्वी मात करता यावी यासाठी जे बाधित आले त्यांना गावातील शिवारात-शेतात विलगीकरण करुन त्या ठिकाणी सर्व सुविधा, औषधे उपलब्ध करुन दिली. यामुळे भोसी गावातील दुसऱ्या लाटेत 14 मार्च ते 12 मे या कालावधीत 119 बाधितांवर पोहचलेली संख्या खाली शुन्यावर आणण्यापर्यंत यश मिळविले. आजच्या घडिला भोसी गावात एकही बाधित नाही, हे विशेष. (271 villages in Nanded blocked the corona just outside the village)
कोरोना अजून हद्दपाल झालेला नसून त्याचे आव्हान कायम आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे. मोठ्या कष्टातून कोरोनामुक्तीच्या बाबत आजच्या घडिला ज्या 1 हजार 450 खेड्यांनी यश संपादन केले आहे, ते यापुढेही टिकविण्यासाठी अधिक दक्षता घेतील. – वर्षा ठाकूर, सीईओ जिल्हा परिषद, नांदेड