नांदेड : नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गाचे (Nanded bidar highway) काम संथ गतीने सुरु असून, त्याचा फटका आतापर्यंत वाहनचालकांना बसत आहे. तर दुसरीकडे कंत्राटदाराचा हलगर्जीपणा थेट शेतकर्याच्या मुळावर आले आहे. महामार्गावर राऊतखेडा फाट्याजवळ उभारण्यात येत असलेल्या पुलाचा पाया भरण्यासाठी खोदलेल्या खड्यातील माती शेजारीली शेतात टाकण्यात आली. तर पावसाचे पाणी जाण्यासाठी नाला नसल्याने पाणी थेट शेतात शिरले आहे. त्यामुळे पिक पुर्णपणे पाण्याखाली आले आहे.
जूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणी करुन घेतली. त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिली. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. परंतु गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. पिकांची उंची कमी असल्याने माती त्यावर जाऊन बसली आहे. दरम्यान, नुकसानिची माहिती प्रशासनाला आणि विमा कंपन्याना द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. (Nanded bidar highway)
नांदेड-बदर राष्ट्रीय महामार्गावर राऊतखेडा फाटा येथे पुलाचे काम सुरु असुन, त्यासाठी केलेल्या खोदकामात निघालेली माती शेता लगत टाकल्याने शेतातील पाणी बाहेर जाण्यासाठी रस्ताच नाही. परिणामी द्रायणी कंपनीचा हालगर्जीपणामुळे 1 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. (Nanded bidar highway)
रविवारी (11 जुलै) बारुळ महसूल मंडळात 77.5 मिली पावसाची नोंद झाली आहे. तसेच मागील तीन दिवसात सतंतधर पाऊस सुरु असल्याने नदी-नाले भरुन वाहत आहेत. जाकापुर-राहाठी गावचा कौठा गावाशी संपर्क तुटला आहे. कौठा येथील शेतकर्यांची 50 टक्के शेती नदी पलिकडे असुन, अनेक शेतकरी त्याबाजूलाच अडकले आहेत. (Nanded bidar highway)