Nanded acb trap news | स्वयंपाकी सेवानिवृत्त महिलेकडून 3 लाख 80 हजार रुपयांची लाच घेणारे संस्था चालक acb च्या जाळ्यात
Nanded acb trap news | नांदेड : धनेगांव येथील कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालयातून (Kundleshwar Residential Handicapped School) स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या स्वयंपाकी महिलेचा मागील 24 महिन्यांचा वेतन काढण्यासाठी संस्थाचालकांनी तब्बल 45 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. तडजोडीनंतर दोन लाख 80 हजार रुपये करताना मुख्याध्यापक आणि संस्थेच्या कोषाध्यक्षाला रंगेहात पकडण्यात आले.
नारायण भाऊराव वाघमारे (Narayan Bhaurao Waghmare) (वय 44 वर्षे, पद – मुख्याध्यापक, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड) अरविंद गंगाधर इंगळे (Arvind Gangadhar Ingle) (वय 30 वर्षे, पद- कोषाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड) आणि बालाजी किशनराव बामणे पाटील (Balaji Kishanrao Bamane Patil) ( उपाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड. अनुक्रमांक 2 व 3 राहणार इब्राहिमपूर , ता. देगलूर, जि. नांदेड.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.