...

Nanded acb trap news | स्वयंपाकी सेवानिवृत्त महिलेकडून 3 लाख 80 हजार रुपयांची लाच घेणारे संस्था चालक acb च्या जाळ्यात

Nanded acb trap news | नांदेड :  धनेगांव येथील कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालयातून (Kundleshwar Residential Handicapped School) स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या स्वयंपाकी महिलेचा मागील 24 महिन्यांचा वेतन काढण्यासाठी संस्थाचालकांनी तब्बल 45 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. तडजोडीनंतर दोन लाख 80 हजार रुपये करताना मुख्याध्यापक आणि संस्थेच्या कोषाध्यक्षाला रंगेहात पकडण्यात आले.  

 

 

नारायण भाऊराव वाघमारे (Narayan Bhaurao Waghmare) (वय 44 वर्षे, पद – मुख्याध्यापक, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड) अरविंद गंगाधर इंगळे (Arvind Gangadhar Ingle) (वय 30 वर्षे, पद- कोषाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड) आणि बालाजी किशनराव बामणे पाटील (Balaji Kishanrao Bamane Patil) ( उपाध्यक्ष, कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड. अनुक्रमांक 2 व 3 राहणार इब्राहिमपूर , ता. देगलूर, जि. नांदेड.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 
  तक्रारदार यांची पत्नी ही कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालय, श्री समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड या शाळेत स्वयंपाकी म्हणून होती. त्यांनी दि. 31/07/2022 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, सेवानिवृत्ती पूर्वीचे 24 महिन्याचे पगार काढण्यासाठी यातील तक्रारदार व त्यांची पत्नी हे मुख्याध्यापक वाघमारे आणि संस्थेचा उपाध्यक्ष बाला जडी बामणे या दोघांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांनी एकूण थकबाकी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर 45 टक्के रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले होते. त्यापैकी 8 टक्के म्हणजे 83 हजार 551 रुपये बिल काढण्याअगोदर घेतले आहेत.

तक्रारदार यांनी 3 जुलै रोजी लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात 10 लाख 44 हजार 396 रूपयांचे 45 टक्के रक्कम म्हणजेच 4 लाख 69 हजार 978 रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तर तडजोड अंती 3 लाख 80 रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन , जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

अँटी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau), परिक्षेत्र, नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (Superintendent of Police Dr. Rajkumar Shinde), पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री राहुल पखाले (Under the guidance of Deputy Superintendent of Police Rajendra Patil, Police Inspector Swapnali Dhutraj, Police Inspector Mr. Rahul Pakhale.), मपोह मेनका पवार, पोकॉ अरशद खान, यशवंत दाबणवाड, चापोह गजानन राऊत यांचा समावेश होता.

 

 

Local ad 1