नांदेड जिल्ह्यात 96 व्यक्ती आढळले कोरोना बाधित

नांदेड  : जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांपेक्षा बुधावारी पुन्हा कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 320 अहवालापैकी 96 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. (Nanded district, 96 persons were found infected with corona)

 

 जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 686 एवढी झाली असून यातील 99 हजार 177 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 824 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Nanded district, 96 persons were found infected with corona)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा 8 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 685 एवढी आहे.

(Nanded district, 96 persons were found infected with corona)
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, हिमायतनगर 3, माहूर 9, परभणी 1, पंजाब 1, अर्धापूर 1, हदगाव 4, मुदखेड 1, हिंगोली 4, उत्तरप्रदेश 1, भोकर 4, किनवट 5, मुखेड 4, यवतमाळ 1, बिलोली 1, लोहा 4, उमरी 1, राजस्थान 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, नांदेड ग्रामीण 4, देगलूर 1, किनवट 1, मुखेड 1 असे एकुण 96 कोरोना बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 215, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 190, खाजगी रुग्णालय 6 असे एकुण 411 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (Nanded district, 96 persons were found infected with corona)

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 440, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 338, खाजगी रुग्णालय 23, असे एकुण 824 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Nanded district, 96 persons were found infected with corona)
Local ad 1