नांदेड जिल्ह्यात 32 व्यक्ती कोरोना बाधित तर 80 कोरोना बाधित झाले बरे
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 516 एवढी झाली असून यातील 99 हजार 633 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 195 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (In Nanded district, 32 people were infected with corona and 80 were cured)
शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 रोजी परभणी जिल्ह्यातील पालम येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. (In Nanded district, 32 people were infected with corona and 80 were cured)
Related Posts
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 24, नांदेड ग्रामीण 1, भोकर 1, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, किनवट 3, लोहा 1, मुखेड 4, हिंगोली 1, परभणी 1, यवतमाळ 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, किनवट 1 असे एकुण 32 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 30, खाजगी रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2 असे एकुण 80 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.