नांदेड जिल्ह्यात 164 व्यक्ती कोरोना बाधित तर 29 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड : जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 510 अहवालापैकी 164 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 145 तर अँटिजेन तपासणीद्वारे 19 अहवाल बाधित आले आहेत. (In Nanded district, 164 persons were infected with corona and 29 were infected with corona)
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 145 एवढी झाली असून यातील 87 हजार 946 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 544 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (In Nanded district, 164 persons were infected with corona and 29 were infected with corona)
Related Posts
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 121, नांदेड ग्रामीण 3, भोकर 2, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, कंधार 1, किनवट 2, माहूर 1, उमरी 1, बिलोली 1, हिंगोली 2, यवतमाळ 2, वाशीम 1, परभणी 5 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, मुखेड 2 असे एकुण 164 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 27, नांदेड तालुक्यांतर्गत एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (In Nanded district, 164 persons were infected with corona and 29 were infected with corona)