नांदेडच्या ‘नम्रता’ची ‘इं’डियन एअर ‘फो’र्समध्ये उड्डाण’ ; गावाने केलं कौतुक

नांदेडNanded good news : नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील राणसुगाव येथील नम्रता जाधव या तरुणीची  ‘इं’डियन एअर ‘फो’र्समध्ये (Indian air force) उड्डाण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे नम्रता जाधवने मिळवलेले यश इतरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (Namrata Jadhav selected in Indian Air Force)  

 

यश मिळवाचे असेल तर अभ्यास करावाच लागेल : डॉ. संभाजी पानपट्टे

 

एअर ‘फो’र्समध्ये अधिकारी पदाला गवसणी घालणारी मराठवाड्यातील नम्रता जाधव पहिलीच तरुणी आहे. नम्रताने मिळवलेल्या यशाबद्दल राणसुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा भव्य सत्कार करण्यात आला. (Namrata Jadhav selected in Indian Air Force)

 

नम्रता जाधवला तिच्या वडिलांकडून ‘सै’न्यदलाचा वारसा मिळाला. नम्रताचे वडील हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नम्रताने हे यश मिळवले आहे. यापूर्वी तिने इलेक्ट्रिक आणि टेलिकम्युनिशेनमधून पदवी मिळवली आहे. नम्रताला 2017 साली एनसीसीच्या 17 लाख विद्यार्थ्यातुन बेस्ट कॅडेटचा अवार्ड मिळवला आहे.

 

 

 

नम्रताने (Namrata Jadhav) मिळवलेल्या यशाबद्दल राणसुगावच्या ग्रामंपचायतीकडून जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी नम्रताने हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले. 

 

अभ्यासला पर्याय नाही

कोणत्या अडचणी आल्या तरी विद्यार्थ्यांनी शिक्षणात खंड पडू देऊ नये. विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे. अभ्याससाशिवाय प्रगतीला कोणताही पर्याय नाही. शेतात आणि इतर ठिकाणी काम केलं तरी अभ्यास सुटू द्यायचा नाही. दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर अभ्यासाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभं राहायचे, अशा शब्दांत नम्रता जाधव  (Namrata Jadhavहिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Local ad 1