सांगलीतील मतदारांची नावे पुरंदर तालुक्यात नोंदविले : विजय शिवतारे
पुरंदर विधानसभा मतदार संघात (Purandar Assembly Constituency) सांगली जिल्ह्यातील (Sangli District) ३२ हजार ३६६ मतदारांची बोगस नावे आढळून आल्याचा धक्कादायक आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Former Minister Vijay Shivtare) यांनी पुण्यात शनिवारी (दि. ३० डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे : पुरंदर विधानसभा मतदार संघात (Purandar Assembly Constituency) सांगली जिल्ह्यातील (Sangli District) ३२ हजार ३६६ मतदारांची बोगस नावे आढळून आल्याचा धक्कादायक आरोप माजी मंत्री विजय शिवतारे (Former Minister Vijay Shivtare) यांनी पुण्यात शनिवारी (दि. ३० डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. (Names of voters from Sangli were registered in Purandar taluka : Vijay Shivtare)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, अंतीम मतदार यादी अद्ययावतीकरण सुरू झाली आहे. त्यातच जिल्हा निवडणूक विभागाने (District Election Department) दुबार तसेच समान छायाचित्र असलेले दीड लाख मतदान कार्ड (Voting card) शोधून संबंधितांना तातडीने दुरुस्ती करण्याबाबत आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील मतदार यादीत ३२ हजार नावे दुबार असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत संपूर्ण पुरावे दिले असल्याचे सांगितले.
३२ हजार बोगस मतदार नोंदणी करणारी दाजी मेहुण्याची जोडी.. pic.twitter.com/kRkLjzlRlu
— Vijay Shivtare (@vijayshivtare) December 30, 2023
शिवतारे म्हणाले, ‘पुरंदर मतदारसंघात अशा मतदाराचे नाव कुठल्या केंद्रावर किती नंबरला आहे यासोबतच कडेगाव पलुस मतदार संघात तो कुठल्या केंद्रावर किती क्रमांकाचा मतदार आहे, येथपर्यंत सखोल माहिती आयोगाला पुरवलेली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी शहरातही अशी हजारो नावे आढळून आली आहेत, असा दावा शिवतारे यांनी केला आहे.
दरम्यान मतदार यादीन दुबार नावे नोंदणी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ही केल्याची सांगितले.