नांदेड शहरात ‘मिशनमोडवर’ नाले सफाई

नांदेड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने मॉन्सूनपूर्व शहरातील नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात शहरात पाणी साचणार नाही यासाठी मनपा योग्य ती काळजी घेतली जात आहे, अशी माहिती महापौर जयश्री निलेशराव पावडे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत दिली आहे. (Nala cleaning mission mode in Nanded city)

 

 

शहराच्या मध्यवर्ती भागात हिंगोली गेट रेल्वे अंडरब्रिज ची देखील पूर्णतः सफाई केली जात आहे. शहराच्या स्वच्छतेसंदर्भात मॉन्सूनपुर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला माझ्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही व अंमलबजावणी होत असून आगामी पावसाळा कालावधीत शहरात पाणी साचणार नाही व रोगराई पसरणार नाही त्यादृष्टीने महापालिका योग्य ते पाऊले उचलत आहे. (Nala cleaning mission mode in Nanded city)

 

 

शहराच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली गेल्या आहे. पावसाळ्यापूर्वी केलेलं हे नियोजन निश्चितच नांदेड शहराला रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Nala cleaning mission mode in Nanded city)

 

Local ad 1