राज्यातील नायब तहसीलदार संपावर, काय आहेत मागण्या जाणून घ्या  

 

पुणे : राज्य कर्मचारी संपवार गेले होत. त्यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मनधरणी केली. त्यानंतर त्यांनी संप मागे घेतले. आता राज्यातील नायब तहसीलदार संपावर गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारची डोकी दुखी वाढली आहे. (Naib Tehsildar on strike in the state of maharashtra)

 

 

राज्यातील महसुल विभागातील नायब तहसिलदार हे राजपत्रित वर्ग 2 चे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन मात्र वर्ग 3 प्रमाणे दिले जाते. नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.(Naib Tehsildar on strike in the state of maharashtra)

 

 

 

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसिलदार संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करून ग्रेड पे वाढविण्याच्या मागणीचा शासनस्तरावरून कोणताही निर्णय होत नसल्याने राज्यातील सर्व तहसिलदारांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार पुणे  जिल्ह्यातील सुमारे 150 तहसिलदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. (Naib Tehsildar on strike in the state of maharashtra)

 

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने दि.3 मार्च 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्य मार्फत शासनास आंदोलनबाबत निवेदन दिले होते. यामध्ये मागण्या मान्य नाही झाल्या तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सुध्दा दिला होता. मात्र शासनाकडून याची कोणतीच दखल न घेतल्याने नाईयजालास्तव तहसिलदारांनी बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

दरम्यान सोमवारी सकाळी जिल्ह्यातील तहसिलदार व नायब तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच तालुका स्तरावरील तहसिलदार व नायब तहसिलदार यांनी आंदोलनात सहभाग घेतला.  (Naib Tehsildar on strike in the state of maharashtra)

 

यापूर्वी शासनस्तरावर बैठक झाली होती. त्यामध्ये हा विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन शासनाकडून दिले होते. मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती. यासमितीकडे ग्रेड पे 4 हजार 800 रुपये वाढविण्या संदर्भात सादरीकरण करूनही तसेच कामाचे स्वरुप, जबाबदारी आदींची माहिती देऊनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

Local ad 1