Naib Tehsildar news । राज्यातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ ची (Naib Tehsildar Gazetted Class-II) वेतन श्रेणी 4800 रुपये करावे, अशी शिफारस के.पी. बक्षी समितीने (KP Bakshi Samiti) केली आहे. मात्र, शासन ही वेतनश्रेणी लागू करत नाही, त्यामुळे तहसीलदार आणि नायब तहसीलदार (Tehsildar, Naib Tehsildar) संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Naib Tehsildars stop work strike warning)
तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने महसूल मंत्री आणि अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांना दिलेल्या निवेदनात यापुर्वी शासनाकडून मिळालेले आश्वासनाची आठवण करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ ची वेतन श्रेणीसाठी 3 एप्रिल 2023 पासून कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी 6 एप्रिल 2023 रोजी वेतन श्रेणी लागू केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही 4800 ही वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
असे आहेत आंदोलनाचे टप्पे..
– 29 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
– 18 डिसेंबर रोजी शासनास स्मरणपत्र दिले जाणार आहे. तसेच जिल्हास्तरावर दोन तास धरणे आंदोलन केले जाणार आहे.
– 28 डिसेंबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मागणी मंजूर पण आदेशच नाही…
३ मार्च २०२३ रोजी राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde, then Finance Minister and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. मात्र, या संदर्भात आदेश काढला जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नायब तहसीलदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाच्या तयारीत आहेत.