सावधान..! वीज मीटर बदलण्यासाठी भामटे येतायेत

पुणे : ‘तुमच्याकडे लावलेले वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शनदिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो वत्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’ अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारीअसल्याचे भासवून महावितरण व वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचाचाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. (Mutual electricity meters pretending to be employees of Mahavitran Exposing the changing gang)

चाकण परिसरात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती महावितरणचेकर्मचारी असल्याची बतावणी करून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कुणकुण महावितरणलालागली होती. यामध्ये हे तोतया कर्मचारी वीजग्राहकांशी थेट संपर्क साधून ‘तुमचेमीटर संथ असल्याने मोठ्या रकमेचे बिल येणार आहे. ते न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणारआहे’ अशी भीती दाखवत आर्थिक लुबाडणूक करणे, जुने महावितरणचे मीटर काढून गहाळ करणेव त्याठिकाणी बाजारातून खरेदी केलेले मीटर ग्राहकांकडे लावत असल्याचे प्रकार होतअसल्याची माहिती मिळाली.

 

या प्रकारच्या माहितीची मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग (Pune Gramin Mandal Superintending Engineer Yuvraj Jarag), राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, चाकणचे उपकार्यकारीअभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता अविनाश सावंत यांनी कर्मचाऱ्यांसहसंशयास्पद वीजमीटरची तपासणी सुरु केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाणरस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीजमीटर बदलले आहे परंतु त्याची महावितरणकडेत्यांची नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले.

 

 

याबाबत संबंधित वीजग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्परवीजमीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रीडिंग घेणाऱ्या अलमदाद कम्प्युटरएजंसीशी संबंधित असल्याचे उघड झाले. आरोपी पट्टेकर व अज्ञात तीन व्यक्तींनीमहावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून कोणतीही पूर्वपरवानगी न घेतागेल्या ऑगस्ट महिन्यात तीन वीजग्राहक कडील वीजमीटर परस्पर बदलून दिले. यामध्ये महावितरणचेसुमारे १ लाख २२ हजार २७७ युनिटचे म्हणजे १३ लाख २८ हजार २७० रुपयांचे नुकसानकेले. याप्रकरणी महावितरणकडून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतरपोलिसांनी  भारतीय विद्युत कायदा २००३नुसार कलम १३६ व १३८ नुसार दयानंद पट्टेकर व तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे.

 

तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान

वीजमीटरधील वापर कमी दाखवणे,संथगतीसाठी मीटरमध्ये फेरफार किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देणे आदी आमिष दाखविणेतसेच महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवून किंवा अन्य खाजगी व्यक्तीने वीजग्राहकांकडेरकमेची मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्यासंबंधित कार्यालयामध्ये कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार यांनी केले आहे.

–  राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे.

Local ad 1