Muslim reservation : अल्पसंख्याक मंत्र्याची भेट नाकारली, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर वंचितचे शिष्टमंडळ ठाम !
मुंबई ः न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिमांचे 5 टक्के आरक्षण लागू करावे आणि धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली घडवणाऱ्या विरुद्ध प्रस्तावित कायदा लागू करावा या मागणीसाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी चर्चेसाठी आलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची भेट नाकारत मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर आंदोलक ठाम आहेत. Muslim reservation: Minority minister’s visit denied, deprived delegation insists on CM’s visit!
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षण लागू करा, या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार वंचितचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना रोखले व विविध पोलीस ठाण्यामध्ये डांबले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यावर वांचीतचे नेते ठाम होते. Muslim reservation: Minority minister’s visit denied, deprived delegation insists on CM’s visit!