महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचा आज सर्वोच्च न्यायालयात फैसला

नवी दिल्ली : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत सनिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायलयात सादर केले आहे. त्यावर आज सुनावणी होणार असून, या निवडणुका कधी होतील, हे स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. (Municipal, Zilla Parishad elections to be heard in Supreme Court today)

 निवडणूक आयोगाने 13 तारखेला आपली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणीसाठी कोर्टानं 17 मे रोजीची दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित केली आहे. (Municipal, Zilla Parishad elections to be heard in Supreme Court today)
आयोगाकडून महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर आज कळणार आहे. (Municipal, Zilla Parishad elections to be heard in Supreme Court today)

राज्यातील पावसाळ्यानंतर महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं न्यायालयात केलेली ही विनंती मान्य होणार का, यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. (Municipal, Zilla Parishad elections to be heard in Supreme Court today)

Local ad 1