Mumbai-Nanded Vande Bharat Express : देशात केंद्र सरकारकडून रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी वेळात पूर्ण करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आले आहेत. नांदेडलाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार मुंबई ते नांदेड दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी (Mumbai-Nanded Vande Bharat Expres) घोषणा केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे एका कार्यक्रमात बोलतना केली. त्यामुळे आता नादेडकरांना वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य लाभणार आहे.
जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील 150 फूट उंच राष्ट्रीय ध्वज व रेल्वे इंजिन लोकोमोटिव्ह बसवण्याच्या कामाच्या भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
Related Posts
राज्यात मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. त्यानंतर राज्यातील इतर मार्गावरही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता नांदेड ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, अशी माहि्ती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे नांदेडकरांना नांदेड-मुंबई प्रवास आता वंदे भारत एक्सप्रेसने करता येणार आहे.