mumbai five star hotel singer story | सुरक्षा रक्षकाने गायले देशभक्तीपर गाणे आणि अवघ्या काही तासांत झाली कमाल

मुंबई : mumbai five star hotel singer story | त्याचे शिक्षण अवघे इयत्ता सातवीपर्यंत… आई-वडिलांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने जगायला आणि जबाबदारी पेलायला शिकला. लहानपणापासून रेडिओ आणि टीव्हीवर गाणे (Radio and tv songs) ऐकुन तो गाणे गायला शिकला, त्याची हिच आवड त्याचा रोजगार बनली. गेली दहा वर्षे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये (mumbai five star hotel singer story) भजन व गाणे गाऊन संसाराचा गाडा हाकत होता…

तो आघाडीचा गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. (bollywood singers) पण दुर्दैवाने 2020 च्या कोरोना महामारीने (corona pandemic) अनेकांचा जसा हक्काचा रोजगार हिरावला तसाच त्याचाही.. म्हणून त्याने हार मानली नाही… जगण्याचा त्याचा संघर्षं कायम आहे. तो आता विरारमधील एका सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करून जगतोय… ही कहाणी आहे, सय्यद वसीम याची… (Society Security Guard wasim sayyed)

उत्तरप्रदेशातील लखनऊ (UP lucknow) येथील मुळचा परंतु सध्या मुंबईतील विरार (Mumbai virar) परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या सय्यद वसीम (wasim sayyed)हा अचानक प्रकाशझोतात आला तो त्याने स्वातंत्र्यदिनी (India independence day) सोसायटीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात गायलेलं एका देशभक्तीपर गाण्याचे. हेच गाणे गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाले आहे. (mumbai five star hotel singer story)

“ऐ गुजरने वाली हवा बता
मेरा इतना काम करेगी क्या
मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे
मेरे गाँव में है जो वो गली
जहाँ रहती है मेरी दिलरुबा
उसे मेरे प्यार का जाम दे”

हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वसीम याचा https://www.mhtimes.in च्या टीमने शोध घेत त्याच्याशी संवाद साधला. यावेळी वसीम यांनी आपला जीवनपट उलगडला.वसीम म्हणाला, मुंबईतील नालासोपारा येथील शाळेत इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण झालं त्यापुढे शिक्षण घेऊ शकलो नाही. आई-वडिल असेपर्यंत कुटुंबाची जबाबदारी नव्हती. आई-वडिलांच्या निधनंतर स्वतःच आयुष्य जगायला शिकलो.mumbai five star hotel singer story

कोरोना येण्यापूर्वी मुंबईतील हॉटेल्समध्ये भजन, नवी व जुनी गाणे गात होतो. त्यात मोहम्मद रफी यांच्या गाण्याचा अधिक समावेश असतो. ते लोकांनाही आवडतात. लखनऊ येथे गेल्यानंतर 4 स्टेज ऑफ परफॉर्मन्स केले आहेत. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे सर्व हॉटेल्स बंद झाली. त्यापूर्वी मला दररोज हजार ते बाराशे रुपये मिळायचे, त्यातूनच घर चालत असे. घरी बायको एकटीच आहे. आम्हा दोघांचा संसार सुरू आहे. कोरोनामुळे सर्वच सर्वांचे आयुष्य बदलून गेले आहे, घरी राहून चालणार नाही. त्यामुळे गेला दोन महिन्यापूर्वी वसई पूर्व भागातील विना डायनेस्टी या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम सुरू केले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत काम असतो, अशी माहिती वसीम याने दिली. (mumbai five star hotel singer story)

त्या दिवशी काय घडलं ?

स्वातंत्र्यदिनानिमित्त सोसायटीच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. त्यासाठी सर्व लोक एकत्र आले होते. त्याठिकाणी माईक होत, त्यामुळे मी एक देशभक्तीपर गाणं गाऊ का, अशी विनंती केली. उपस्थितांनी विनंती करायची काही गरज नाही, असे सांगितलं. त्यानंतर मी गायलेलं गाणं, सर्वांना आवडलं. सगळ्यांनी माझं कौतुक केलं. अनेकजण गळ्यातुन जातात तू मात्र मनातून गायलास, अशा शब्दांत कौतुक केलं आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं, असे वसीम सांगतो.

स्टेज परफॉर्मन्सही केले

वसीमचा वसीम सय्यद नावाने युटूब चॅनल आहे, त्यावर तीन व्हिडीओ अपलोड केले आहेत. तीनही व्हिडीओ हे स्टेज परफॉर्मन्स आहेत. एका व्हिडीओ मध्ये सूत्र संचलन करणारा वसीम यांची ओळख करून देताना, तो बऱ्याच वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे, तो, आपल्या समोर गाणं सादर करणार आहे, असे म्हणतो. त्यावेळी वसीम म्हणतो, आप लोक सहरदपर देश और हमारी सुरक्षा करते है, आपकी ही बदौलत हम घर मे सुकून से सोते है, यावरून समोर बसलेले प्रेषक हे भारतीय सैनिक असावेत.

आयुष्यात खूप काही करायचं आहे पराभव मानणार नाही

आयुष्यात खूप काही करायचं आहे, त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मी मोहम्मद रफी यांना अधिक ऐकतो आणि गातो. गाणे गाण्यासाठी कुठलेही शिक्षण घेतले नाही किंवा रियाज केला नाही. बॉलिवूड मध्ये गाण्याची संधी शोधतोय, यापूर्वी खूप प्रयत्न केले आहेत. पण यश मिळालं नाही. भविष्यात प्रयत्न सोडणार नाही, विश्वास आहे, एक दिवस संधी मिळेल, असा आशावाद वसीम यांनी व्यक्त केला आहे.

सोसायटीतील सदस्याने केला व्हिडीओ व्हायरल

आमच्या वीणा डायनेस्टी फेज – १, एव्हशाईन सिटी लास्ट बस स्टॉप, वसई पूर्व, सोसायटीतील सदस्य राजेश शिर्के म्हणतात, “सुरक्षा रक्षक वसीम सय्यद याने सुंदर आवाजात गाणं म्हणून सगळ्यांची मन जिंकुन घेतली आहेत. तुम्हालाही आवडलं असल्यास पुढे शेअर करा. त्याचं यूट्यूब चॅनलची लिंक शेअर केली आहे. चॅनलवरचे व्हिडिओ पाहता मनात प्रश्न निर्माण झाले. परिस्थिती कुठून काय करायला लावेल हे कोणालाच माहित नाही….. त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..!”

Local ad 1