(Mucormycosis) म्यूकर मायकोसिस वेळीच उपचाराने आजार बरा होतो : डॉ. बालाजी शिंदे
नांदेड : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना म्यू्कर मायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव अनेक रुग्णांना होताना दिसत आहे. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग बरा होऊ शकतो. नागरिकांनी म्यूयकर मायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्याणस तात्काळळ वैद्यकीय उपचार घ्यावेत व कोरोना प्रतिबंधात्मूक उपाययोजनांचे पालन करावे असे, आवाहन जिल्हा आरोग्यय अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. (Mucormycosis)
म्यूयकर मायकोसिस रोगमुळे जबडा, डोळे,नाक आणि मेंदू यांना बाधित करतो. हा रोग अनियंत्रित मधुमेहामुळे व कोरोना उपचारादरम्याआन स्टॅराईड किंवा इतर औषधे जास्त प्रमाणात शरीरात गेल्यामुळे उद्भवतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्तीई कमी आहे, अशा व्यक्तींना हा आजार होण्यााची शक्य ता जास्ता असते. चेहऱ्यांचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्याआची एक बाजू दुखणे, नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतुन रक्तयस्त्राोव, काळपट स्त्रा व, चेहरा अथवा डोळ्यावर सुज येणे, डोळा दुखणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, दात दुखणे किंवा हलु लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. (Mucormycosis)
रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे. कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोग तज्ञांकडून एक आठवड्यानंतर तपासणी करावी. डॉक्टेरांनी सांगीतलेली औषधे घ्याोवीत. दिवसातून दोनदा मिठाच्या कोमट पाण्यातच्याा गुळण्या कराव्यात. टूथब्रश एक महिण्यात बदलावा. मास्क वरचेवर बदलावा, कापडी मास्क रोज धुवावा. फळे भाजीपाला मिठाच्या पाण्यांने स्वच्छ पाण्यााने धूवून घ्याव्यीत. मातीशी, शेतीशी, कुजलेली झाडे सोबत संबध येत असल्यास मास्का व फुल बाहीचे शर्ट व ग्लोजचा वापर करावा. वैयक्तिक परिसराची स्वच्छता ठेवावी. (Mucormycosis)