पुणे विभाग पर्यटनामध्ये MTDC ठरला सरस
पुणे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) पुणे विभागाने विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्ध वार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवासे सरस ठरली आहेत. (MTDC is the best in Pune division tourism)
मागिल वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यांनतर पुणे विभागातील पर्यटक निवासांमध्ये वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्षणिय वाढ दिसुन आली आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whatsapp ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात आल्याने आणि पर्यटनाची प्रसिध्दी विविध माध्यमातुन पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यामुळे पुणे विभागातील पर्यटनास नवा आयाम मिळाला आहे. (MTDC is the best in Pune division tourism)
Curfew in Nanded। नांदेड जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी
पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या अव्याहतपणे सुरु असलेल्या उपाययोजना, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे केलेली स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्था, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी दिलेली सुविधा यांमुळे महामंडळाची पर्यटक निवासे पर्यटकांना आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री पटली आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत भरघोस प्रतिसाद दिला आहे. (MTDC is the best in Pune division tourism)
मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटकांनी निसर्गाकडे धाव घेतली होती. डिसेंबर आणि नाताळच्या हंगामामध्ये पर्यटकांसाठी महामंडळाकडुन अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. विविध छंद, पारंपारीक खेळ, छोटे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी बाबींमुळे पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणित झाला आहे. (MTDC is the best in Pune division tourism)
महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये माळशेज घाट पर्यटकाचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना एप्रिल 2021 ते सष्टेंबर 2021 या कालावधीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणुन प्रमाणित करण्यात आले आहे. महाबळेश्वर पर्यटक निवासासचे व्यवस्थापक सुहास पारखी यांना नोव्हेंबर महीन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणुन गौरविण्यात आले.पानशेत पर्यटक निवासासचे व्यवस्थापक गणेश मोरे यांना एप्रिल 2021 ते सष्टेंबर 2021 या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणुन गौरविण्यात आले आहे. या सर्वोत्तम कामगिरीबददल प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांना महामंडळाने खास प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे. (MTDC is the best in Pune division tourism)
“वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांडयातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थाना दिलेलं प्राधान्य यांमुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकांनीही निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवुन शासकिय नियमांचे पुरेपुर पालन करीत पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घेतला.
– दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विकास महामंडळ, पुणे.