...

वर्षा पर्यटनाबरोबरच हिवाळी पर्यटनासाठी mtdc होतोय सज्ज

पुणे Mtdc : कोरोना आणि लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना शासनाने काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, पर्यटनासाठी जाण्याचा अनेकजण विचार करत आहेत. परंतु, पर्यटनाला गेल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित राहण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) पावसाळी (Rainy season tourism) पर्यटनाबरोबरच आता हिवाळी पर्यटनासाठी सज्ज होत आहे. (MTDC is getting ready for winter tourism) त्याचबरोबर महामंडळाने पर्यटकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.  

MTDC is getting ready
MTDC is getting ready

 

मागील वर्षी आणि यावर्षीही कोरोना महामारीमुळे घरी राहुन त्रस्त झालेल्या पर्यटकांना आणि लहानथोरांना आता मनमोकळं पर्यटन करता येणार आहे. मागिल काही कालावधीपासुन कोरोनाचा प्रकोप वाढल्याने आधी संचारबंदी आणि मग लॉकडाऊन सुरु झाल्याने पर्यटन बंद होते. पर्यटन स्थळे पर्यटकांविना सुनी पडली होती. (MTDC is getting ready for winter tourism)

 

MTDC is getting ready
MTDC is getting ready

सध्या राज्यात मान्सुन अंतीम टप्प्यात आला असुन सर्वत्र निसर्गानं हिरवी शाल पांघरली आहे. त्यामुळे हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावत आहेत. निसर्गाचं मनमोहक रुप मनात साठविण्यासाठी, दऱ्या डोंगरावर भटकंती करण्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची (To get acquainted with the culture of Maharashtra) ओळख करुन घेण्यासाठी पर्यटक आसुलेले आहेत. हे सर्व पर्यटक पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवांसांमध्ये येत आहेत. (MTDC is getting ready for winter tourism)

https://www.facebook.com/127438095497626/posts/353776939530406/

 

हिवाळी पर्यटनालाही पर्यटक पसंती देत असल्याचे दिसुन आले आहे. लॉकडावुन मुळे सार्वजनिक प्रवासी वाहतुक ठप्प होती. यात एसटी, रेल्वे वाहतुकही बंद होती. (ST, rail traffic was also closed.)
त्यामुळे सक्तीने घरातच बसावे लागलेला वर्ग खुपच कंटाळला होता. हा सर्व वर्ग आता वर्षा पर्यटनाचा तसेच हिवाळी पर्यटनाचा बेत आखत आहे. दमदार पावसामुळे निसर्गाने मनमोहक अशी हिरवाई वाढली आहे. त्यातच आगामी हिवाळी हंगाम येणार असल्याने त्यासाठी आतापासुनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसुन येत आहे. (MTDC is getting ready for winter tourism)

गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी च्या सुटटयांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. कोरोना नियंत्रणात राहील्यास आक्टोबर, डिसेंबर पासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरु होणार आहे.
हिवाळी पर्यटन हंगामासाठी महामंडळाच्या पर्यटक निवासांचे जोरदार बुकिंग सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.

सवलततींचा वर्षाव
पर्यटकांसाठी अनोख्या सवलती जाहीर केलेल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांध्लिकी जपताना आजी – माजी सैनिक आणि अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना कॉप्लीमेंटरी ब्रेकफास्ट ची सुविधा जाहीर केली आहे.

 

उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असुन आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरुन पर्यटक निवासात औषधेपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्था पुर्वीपासुनच करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणुन कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

 

“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासे सुरु झाली असुन www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेवुन मोठया प्रमाणावर सवलती देण्यात येणार असुन पर्यटकांसाठी नाविन्यपुर्ण अशा वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वाय फाय सुविधा पुरविण्यात येत आहेत.”

दिपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे

Local ad 1