MPSC च्या परिक्षा पुढे ढकलल्या ; वयमर्यादेच काय ?
पुणे : कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्यातून प्रत्येकजण आपआपल्या परिने बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. मात्र, अनेक अशा समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी राज्य सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) लांबणीवर पडल्या आहेत. वयमर्यादेच काय? असा सवाल उपस्थित होत आहे. MPSC exams postponed; What is the age limit?
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह विविध शहरात आंदोलन केली होती. त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परीक्षा आणि इतर प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे वयोमर्यादा देखील वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होऊन बराच वेळ उलटला आहे. परंतु आदेश निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. MPSC exams postponed; What is the age limit?