(MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district) नांदेड जिल्ह्यात ‘एमपीएस’ची 34 केंद्रावर होणार परिक्षा

नांदेड : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यभर निद्यार्थ्यांमध्ये असंतोष दिसून आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन 21 मार्च रोजी परिक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार रविवारी नांदेड जिल्ह्यात 34 केंद्रावर परिक्षा असून, त्यात 9 हजार 816 विद्यार्थ्यी परिक्षेसा बसणार आहेत. त्याची जिल्हा प्रशासानाने तयारी पूर्ण केली आहे. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील कोरोनाची चाचणी घेतली जात आहे. रविवारी (21 मार्च) सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते पाच या वेळेत परीक्षा होणार आहे. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district)

शहरातील बाबानगर येथील यशवंत वरिष्ठ महाविद्यालय तळ व पहिला मजला या केंद्रावर 480 परिक्षार्थी, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय 384, यशवंत महाविद्यालय सायन्स इमारत 192, नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय 288, शासकीय तंत्रनिकेतन बाबानगर 264, आदर्श विद्यालय टिळकनगर 192, महात्मा फुले हायस्कूल पहिला मजला बाबानगर 300, सावित्रीबाई माध्यमिक शाळा 192, प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलासनगर 240, सायन्स कॉलेज 307, पीपल्स कॉलेज 384, नागसेन हायस्कूल, प्रभातनगर 192, राजर्षी शाहू विद्यालय 336, एमजीएम 360, केंब्रिज विद्यालय 480, पीपल्स हायस्कूल 192, विद्यामंदीर 240 विद्यार्थ्यांची असन व्यवस्था करण्यात आली आहे. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district)

तसेच टायनी एंजल्स लक्ष्मीनगर वाडी बुद्रुक 288, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बुद्रुक 480, आंध्र समिती हायस्कूल गवळीपुरा 240, खालसा हायस्कूल बाफना टी पॉइंट 192, शारदाभवन हायस्कूल जुना मोंढा 240, प्रतिभा निकेतन महाविद्यालय बंदाघाट 240, गुजराती हायस्कूल वजीराबाद 432, नेताजी सुभाषचंद्र बोस तारासिंग मार्केट 192, नागार्जुन पब्लिक स्कूल कौठा 384, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको 336, कुसुमताई माध्यमिक शाळा सिडको 240, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको 240, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको 240, इंजीनियरिंग कॉलेज विष्णुपुरी 264, सेवाभावी संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी 288, सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यापक महाविद्यालय विष्णुपुरी 192, महात्मा फुले हायस्कूल तळमजला बाबानगर 192 असे एकूण नऊ हजार 816 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district)

MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district
MPSC

परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका हॉलमध्ये चोवीस विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सोशल डिस्टंसिंगनुसार करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन वेळा सॅनिटायझर करण्यात येणार आहे. एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी जर कोरोना पॉझिटि असेल तर त्या विद्यार्थ्यांना पीपी किट परिधान करुन परिक्षा द्यावी लागणार आहे. तसेच त्यांची स्वतंत्र बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड शहरात एमपीएससीची नऊ हजार 816 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (MPSC examination will be held at 34 examination centers in Nanded district)

Local ad 1