Mpsc Exam Date 2024 । एमपीएससीची पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, कधी होणार जाणून घ्या

Mpsc Exam Date 2024 । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे अंदाजे 28 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल, असे एमपीएससीकडून जाहीर करण्यात आले आहे. (mpsc exam date 2024: MPSC preliminary exam date announced)

 

एमपीएससीकडून 2024 (mpsc exam date 2024) मध्ये घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाकडून दरवर्षी नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यादृष्टीने आयोगाकडून काही महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात येते.
पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये 16 परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे. (mpsc exam date 2024: MPSC preliminary exam date announced)
Local ad 1