कोंढवा येथील कतलखान्या संदर्भात पुणे महापालिकेला महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra State Pollution Control Board) काेंढवा येथील कत्तलखान्या (Slaughterhouse in Kondhwa) संदर्भात नोटीस पुणे महापालिकेला (MPC Board issues notice to PMC) नोटीस बजावली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आवश्यक त्या उपाययाेजना करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत महापािलकेने मंडळाकडे मागितली आहे. त्यानुसार कामे पुर्ण केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कत्तलखान्यासाठी नवीन जागा शाेधली जात आहे, असेही सांगण्यात आले. ( issues notice to Pune Municipal Corporation)
पुणे, महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra State Pollution Control Board) काेंढवा येथील कत्तलखान्या (Slaughterhouse in Kondhwa) संदर्भात नोटीस पुणे महापालिकेला (MPC Board issues notice to PMC) नोटीस बजावली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आवश्यक त्या उपाययाेजना करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत महापािलकेने मंडळाकडे मागितली आहे. त्यानुसार कामे पुर्ण केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कत्तलखान्यासाठी नवीन जागा शाेधली जात आहे, असेही सांगण्यात आले. ( issues notice to Pune Municipal Corporation)
महापािलकेचा काेंढवा येथे सर्वांत जुना कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यात साधारणपणे दाेनशे म्हैस ठेवण्याची क्षमता आहे. साधारणपणे दिडशे म्हैस या ठिकाणी कापल्या जातात. तसेच लहान जनावरांचीही कत्तल याच भागात केली जाते. या भागात पूर्वी लोकवस्ती मर्यादित होती. आता लाेकवस्ती, गृह निर्माण साेसायटींची संख्या वाढली आहे. या कत्तलखान्यातून दुर्गंधी येते, त्यातील दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावरुन वाहते अशा स्वरुपाच्या तक्रारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या गेल्या हाेत्या. या तक्रारींची दखल घेत मंडळाने महापािलकेला नाेटीस पाठविली हाेती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डाॅ. नीना बाेराडे (Dr. Nina Borade), पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. सारीका फुंडे – भाेसले यांनी कत्तलखाना येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वापरल्या गेलेल्या पाण्यावर प्रक्रीया करून ते ड्रेनेज मध्ये सोडले जाते. सदर ड्रेनेज लाईन तुंबल्याने या भागातील रस्त्यांवर पाणी येत हाेते. या कत्तलखान्याजवळील ड्रेनेज लाईन जुन्या आहेत. या कत्तलखान्यात दाेन स्वतंत्र लाईन टाकल्या जातील. त्यासंदर्भात ड्रेनेज विभागाशी चर्चा सुरु असल्याचे डाॅ. बाेराडे यांनी स्पष्ट केले.
मंडळाने पाठविलेल्या नाेटीसवर महापािलकेने केल्या गेलेल्या उपाययाेजना आणि पुढील काळातील उपाययाेजनांची माहीतीसह उत्तर दिले आहे. या भागात पसरलेले सांडपाणी हे व्हॅक्युम व्हॅनच्या माध्यमातून गाेळा करुन ते पाॅलिशिंग टॅंकमध्ये साठविले जाते. कत्तलखान्यात निर्माण हाेणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे, कत्तलखान्याची सफाई करून परीसरात डिओडाेरायझरची फवारणी केली जाते. कत्तलखान्यात वापरले जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रीया केली जाते. त्याच्या गुणवत्तेचा प्रमाणित प्रयाेगशाळेतून मासिक अहवाल घेतला जाताे. कत्तलखान्यातील उपकरणे ही पंधरा वर्षे जुनी आहेत, त्यात वांरवार बिघाड हाेत आहे. कत्तलखाना अद्ययावत करण्यासाठी जागतिक बॅंक मिशनच्या सहकार्याने काम केले जात आहे. त्याचा विकास आराखडा तयार झाला असुन, निविदा प्रक्रीया केली जाणार आहे, असेही सांगण्यात आले.