MP Supriya Sule । पुणे : वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी (substation) त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. (MP Supriya Sule warned of hunger strike)
बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याच्या बाबतील कार्यवाही झालेली नाही. महावितरणने याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशनचा विषय मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी…
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2023
महावितरण, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हाधिकारी (Pune Municipality, PMRDA, Pune Collector) यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून, येत्या २० नोव्हेंबर पर्यंत सबस्टेशन बाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.
महावितरणने (Mahavitaran) याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशन प्रश्न मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी आपण स्वतः २० नोव्हेंबरला येथे उपोषणाला बसणार आहोत. जनतेच्या सुविधेसाठी हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील उर्जा खात्याकडून याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.