पंतप्रधानांच्या महाराष्ट्राविषयी वक्त्यावर खासदार संजय राऊत यांनी केलं भाष्य
नवी दिल्ली : करोनाकाळात मजुरांना बिहार, उत्तर प्रदेश आणि राज्यामध्ये घरी जाण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जबरदस्तीने घरी पाठवले आहे. त्यामुळेच कोरोनावाढला, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सभागृहात केला आहे. त्यावर आता शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाष्य केल आहे. (MP Sanjay Raut commented on the Prime Minister’s speech on Maharashtra)
महाराष्ट्राच्या सरकारने बोलावे
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर बोलताना सोनू सूद हे कोणाचे होते, सोनू सूदला राज्यपालांकडे कोण घेऊन जात होते, असा सवाल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी बोलावे, असे ते म्हणाले. (MP Sanjay Raut commented on the Prime Minister’s speech on Maharashtra)
सोमय्यांनी जो बायडकडे जावे…
किरीट सोमय्यांच्या आरोपांचे पोलीस पाहतील. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे जावे. त्यांनी जो बायडन यांना भेटावे, आंतरराष्ट्रीय न्यायलयात जावे. कायद्याचे राज्य आहे, कोणावरही खुनी हल्ला झाला असेल तर कायदा काम करतो, असे देखील संजय राऊत म्हणाले. (MP Sanjay Raut commented on the Prime Minister’s speech on Maharashtra)