पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : अजित पवार

मुंबई : बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Rose Hurricane) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थिती निर्माण झाली आहे. (Marathwada, Central Maharashtra has been flooded due to heavy rains) पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. (Move flood victims to safer places : Ajit Pawar)

 

 

मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. (Move flood victims to safer places : Ajit Pawar)

 

अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. 

Web Title : Move flood victims to safer places : Ajit Pawar

Local ad 1