(Reservation) आरक्षण हक्क कृती समितीचा 26 जूनला पुण्यात मोर्चा

पुणे ः  पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भात येत्या 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुण्यामध्ये विविध मागासवर्गीय संघटनांच्या वतीने  मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. आरक्षण हक्क कृती समितीच्या पुण्यात झालेले  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. Morcha of Reservation Right Action Committee on 26th June in Pune

संविधान फाऊंडेशनचे प्रमुख तथा आरक्षण हक्क कृती समितीचे विशेष निमंत्रित निवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात  घेण्यात आली. 

या बैठकीला पुणे विभागातील विविध मागासवर्गीय संघटनाचे  प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये बिसेफचे सुनील निरभवणे, कॅनरा बँक कर्मचारी असोसिएशनचे शरद कांबळे,आरक्षण हक्क समिती मुंबईचे सिद्धार्थ कांबळे,अधीक्षक अभियंता  महेंद्र वानखेडे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे,, अनुसूचित जाती -जमाती संघटनांच्या अखिल भारतीय परिसंघाचे डॉ. संजय कांबळे
बापेरकर, बानाईचे पांडुरंगशेलार उद्योजक  अविनाश कांबळे,महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे डॉ. बबन जोगदंड, रिपब्लिकन कर्मचारी फेडरेशनचे विनोद चांदमरे, कास्ट्राईबचे मिलिंद रणपिसे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. Morcha of Reservation Right Action Committee on 26th June in Pune


 या बैठकीत सरकारची आरक्षण विरोधी भूमिका ही घातक असून मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना सरकार जाणून-बुजून पदोन्नती नाकारत आहे,यामुळे राज्यभरातील 70 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णय आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने घेण्यात आला. Morcha of Reservation Right Action Committee on 26th June in Pune


 आज झालेल्या बैठकीत कृती समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ कांबळे यांनी प्रास्ताविकात हे आंदोलन अधिकारी- कर्मचाऱ्यां पुरते सीमित न राहता या आंदोलनामध्ये सर्व मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी आपल्या कुटुंबीयांसह सहभागी व्हावे, असे आवाहान केले.
 सुनील निरभवणे यांनी महाराष्ट्रामध्ये 26 जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी-कर्मचारी यांच्याबरोबरच विद्यार्थी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.


आरक्षण धोरण विरोधातील अधिकारी यांचे विरुद्ध  जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल असेही सूचित केले. शासन कंत्राटीकरण, खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा डाव खेळत आहे.यालाही विरोध करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  आरक्षणाबरोबरच संरक्षण आणि विकास असे  इतरही सामाजिक प्रश्नी समाजातील  लोकांना जागृत करण्याचा कार्यक्रम कृती समितीने राबवावा  असे आवाहनही त्यांनी केले.


26  जूनच्या आंदोलनाला सर्व राजकीय संघटनां, महिला, युवक ,महिला,बचत , गावपातळीवर काम  करणारे कर्मचारी यांचा सहभाग व त्यातून मास बेस  आंदोलन समाज हितासाठी, बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या साठी मजबूत करावेअशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी इंजि. महेंद्र वानखेडे,पांडूरंग शेलार, विनोद चांदमारे, शरद कांबळे,सुभाष मराठे,डॉ.संजय कांबळे यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन जोगदंड यांनी केले.


 या बैठकीला अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे,राजेश साबळे, स्वप्निल श्यामकुवर,संजय पिंपोडकर, उत्कर्षा शेळके, ज्योती सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी शरद कांबळे, विजय कांबळे, राम  सर्वगोड,  दिलीप लोखंडे,   हरीश गायकवाड, विजय कांबळे, पंडित त्रिभुवन,  निलेखा तोटे, गोवर्धन सोनवणे, श्रीमंत लोखंडे, बाबासाहेब अंबुरे, लक्ष्मण मुदळे, मिलिंद रणपिसे, मोहन सुखदेव, जनार्दन लोंढे यांच्यासह संघटनांचे मुंबई, अहमदनगर, सोलापूर,सातारा येथील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. Morcha of Reservation Right Action Committee on 26th June in Pune

Local ad 1