...

चंद्रदर्शन झाले,रमजान महिना सुरू

पुणे : चंद्रदर्शन झाल्यामुळे रमजान  (Ramadan)   हा मुस्लीम  (Muslim)  बांधवांचा पवित्र महिना सुरू झाला आहे. चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांचे उपवास उद्यापासून सुरू होत आहेत. चंद्रदर्शन झाल्याच्या आधारे रमजान महिना आज सायंकाळनंतर सुरू झाले आहे. मुस्लीम बांधव 3 एप्रिलच्या सकाळपासून आपले रोजे पकडायला सुरुवात करतील. रोज्यांचा महिना अर्थात रमजान  (Ramadan)  हा पवित्र महिना 2 मे रोजी रमजान महिना (Ramadan Eid) समाप्त होईल. 
 

रमजानच्या   (Ramadan)  या पवित्र महिन्यात इस्लाममध्ये काही गोष्टी सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यात ज्या प्रत्येकाने पूर्ण श्रद्धेने करायलाच हव्यात. रोजा म्हणजे उपवास आणि त्यानंतर नमाज   (Prayers)  यात फक्त उपवास करण्याला अर्थ नाही तर ते करत असताना देवाचे नामस्मरण आणि पाचवेळची आणि संध्याकाळची स्पेशल असलेली तरावीहीची नमाज   (Prayers)  अदा करायलाच हवी. त्यात कुराणचे पठण केले जाते.

 

 

 

रमजान महिना तीन विभागात विभागला..

इस्लाममध्ये रमजानच्या महिन्याला तीन विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक दहा दिवसांनंतर एक अशरा म्हणजे दहा दिवसांचा नियोजित कालावधी असतो. असे दहा दिवसांचे तीन अशरे निश्चित करुन देण्यात आले आहे. यामध्ये उपवास आणि नमाजचे महत्त्व सांगण्यात आल्याची माहिती अनेक जाणकार सांगतात.  (Moon sighting, beginning of the month of Ramadan)

 

 

 

पूर्ण क्षमतनेे साजरा होणार रमजान

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रमजान ईदवर सावट होते. सण नियम आणि निर्बंध पाळून साजरा करण्यात आला होता. परंतु आता कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रोजे ठेवण्यापासून ते ईद उत्सहाने साजरा केली जाणार आहे.  (Ramadan will be celebrated to its full potential)

 

 

इस्लामी दिनदर्शिका   (Islamic calendar) 
मुस्लीम बांधवांसाठी रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना असून, ही दिनदर्शिका चंद्राच्या कलांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले, तेव्हा पासून म्हणजेच इसवी सन पूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली.

 

 

30 दिवसाच्या रोज्यानंतर होते ईद साजरी

इस्लामी कॅलेंडरनुसार शाबाननंतर येणारा रमजान हा नववा महिना असतो. इस्लाममध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक दिवसाआधी चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सुरू होतात. 30 दिवस सतत उपवास केल्यानंतर रमजानचा महिना संपताच ईदचा सण साजरा केला जातो.  (Moon sighting, beginning of the month of Ramadan) 

Local ad 1