Monsoon in India 2023 : मान्सून केरळात दाखल, तळकोकणात कधी येणार?

Monsoon in India 2023 : बुधवारी हवामान विभागाने (Department of Meteorology) 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार एक आठवडा उशीराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मात्र, तळकोकणात म्हणजेच महाराष्ट्रात येण्यासाठी अजून वाट पाहवी लागणार आहे.

 

 

नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान विभागाने केली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Local ad 1