(Monday Vaccination) जिल्ह्यात सोमवारी 89 केंद्रांवर लसीकरण होणार
नांदेड : जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 89 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 24 मे रोजी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध आहे. रविवारी कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 340 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 40 हजार 270 डोस प्राप्त झाले आहेत. (Monday Vaccination)
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रांवर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, कौठा व सिडको या 5 केंद्रांवर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय येथे कोविशील्डचे 80 डोस, शहरी दवाखाना जंगमवाडी येथे कोविशील्डचे 30 डोस व शहरी दवाखाना शिवाजीनगर येथे कोविशील्डचे 20 डोस दिले आहेत. (Monday Vaccination)
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोविशील्डचे 90 डोस, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोविशील्डचे 30 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 20 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.
हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. —