Sushma Andhare : ‘मोदीजी आम्हांला आटा पाहिजे, इंटरनेट डेटा नाही’
Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरू असून, आज वाशी येथे सभा झाली. त्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Shiv Sena Deputy Leader Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना लक्ष करत मोदीजी आम्हांला आटा पाहिजे, इंटरनेट डेटा नाही, अशा शब्दांत टिकास्त्र सोडले आहे. (Modiji we need atta, not internet data)
महा प्रबोधन यात्रेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची भाषण गाजत आहेत. वाशी येथे आयोजित महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. मोदींजींना विचारायचे असेल तर मला हिंदी मधून च बोलावे लागेल. बोली भाषेत बोलून काय उपयोग. मोदीजी आम्हाला आटा पाहिजे, डाटा नाही. मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना त्या म्हणल्या की, ”दीदी ओ दीदी, असे व्यक्तव्य मोदी यांनी बंगालमध्ये केले होते, ते चालते काय?”, असा सवाल उपस्थित केला आहे. (Modiji we need atta, not internet data)
शिंदे आणि ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, फडणीस यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिंदे यांना चिन्हासाठी मदत केली. फडणवीस आणि शिंदे या दोन तलवारी एकाच ठिकाणी कशा राहणार. अंधारे म्हणाल्या, भाजपाचा युएसपी जातीयवादी आहे. लोकांना घरे नाहीत. मग मोदीची घरघर तिरंगा कसा पोचणार? देशात अनेक भागात महिलांवर अन्याय झाले. अत्याचार झाले, आता स्मृती इराणींच्या स्मृतीस काय झाले, असा सवाल उपस्थित केला. (Modiji we need atta, not internet data)