दहा वर्षे सत्तेत असूनही मोदी, शहा गल्लीत घरोघरी फिरत आहेत – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे 

पुणे. देशात सत्तेत येऊन देखील विधानसभा निवडणुकीत गल्लोबोळात घरोघरी फिरत असल्याचे मी पहिल्यांदा पाहात आहे. शेतकऱ्यांच्या पीकमालाच्या हमीभावावर आणि विकासाकामांवर बोलण्याऐवजी केवळ गांधी कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टिका केली जात आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Congress Party National President Mallikarjun Kharge) यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. (Modi Shah are busy criticizing Gandhi family than talking about development)

 

 

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध  – खा. इम्रान प्रतापगडी

 

विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) विविध मतदारसंघात प्रचारासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी खरगे म्हणाले, आजपर्यंतच्या अनेक विधानसभा निवडणुका मी पाहील्या, परंत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Prime Minister Narendra Modi, Home Minister Amit Shah) गल्लीबोळात, घरोघरी फिरत असल्याचे चित्र पाहत आहे.  विचारधारेविरोधात शिवीगाळ केली तर ठीक आहे, परंतु लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा न करता गांधी घराण्यात विरोधात खालच्या पातळीवर टीका करतात. आम्ही कधीही टिकेची पातळी घसरू दिली नाही. परंतु मोदी गांधी कुटुंबाच्या विरोधात टीका करत आहेत. महाराष्ट्रात, झारखंड निवडणुकांत गांधीवर टीकाच करत आहेत. तुम्ही केलेल्या विकासकामावर न बोलता केवळ टीका करत आहेत. महागाई रोजगारनिर्मिती गुंतवणूक उद्योग गुजरातला पळवित आहेत, त्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. मुंबई, बंगलोर आणि चेन्नईमध्ये गुंतवणुकीसाठी उद्योजक उत्सुक आहेत. जिकडे तिकडे नेहरू आणि गांधींची नावे का दिली जातात, यावर मोदी बोलतात. परंतु जिवंत असताना देखील सरदार पटेल क्रिकेट स्टेडीयमला स्वत:चे नाव का दिले.

 

 

Mahavikas Aghadi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा ; काय आहे ‘महाराष्ट्रनामा’मध्ये

विदर्भ मराठवाड्यात नाशिक सोयाबीन, कांदे आणि कापूस खरेदी निर्माण करण्याची लोकांची मागणी आहे. दहा वर्षे सत्तेत असून देखील एमएसपी कधी देणार हे सांगत नाही. आम्ही सत्तेत आलो की कापूस, सोयाबीन आणि शेतमालाला हमीभावापेक्षा  त्यावरील दर देऊ. शेतकर्‍यांच्या मागण्यावर काम करण्याऐवजी कर्नाटक तेलंगणातील भ्रष्ठाचाराचे आरोप करतात. महाराष्ट्रात आमदारांना ५० खोके देत सत्ता स्थापन केले. भाजप प्रणित राज्यातील सरकार भ्रष्ठाचारावर स्थापन झालेले आहेत. ईडी इन्कम टॅक्स सीबीआयची भिती दाखवून ब्लॅकमेलिंग करत आहेत. केंद्रातील सरकार वाचविण्यासाठी नैतिक बळाचे खोटे दावे करत आहेत. ज्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केले, तुरुंगात डांबले त्यांनाच सोबत घेऊन सत्ता स्थापन केले.

मोदी ज्या ठिकाणची उद् घाटने करतात तिथे काहीतरी गडबड होते. सिंधूदूर्गातील शिवाजींचा पुतळा पडला, राममंदिरात पाणी गळतय, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना वगळून  संसदेच्या उद् घाटन स्वत: केले तिथे पण पाणी गळत आहे. बुलेट ट्रेनचाच पूल पण पडला पण ११ वर्षात बुलेट ट्रेन आलीच नाही. आरक्षणाचे धोरण काँग्रेसने आणले आता भाजप ते संपवायला निघालेत. ते देशाचे संविधान मानत नाहीत, राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र मानत नाहीत. आजपर्यंत त्यांच्या मुख्यालयावर भारतीय तिरंगा फडकविला नाही. ते आता मात्र संविधानाचा गौरव करत असल्याबद्दल आश्चर्य वाटते. आम्ही कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात पाच गँरटी दिल्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत. महाराष्ट्रात देखील पूर्ण करू. परंतु मोदी की गँरंटी कुठे गायब झाली. पंतप्रधान दोन मित्रांसाठी काम करत आहेत. देशाची संपत्ती असलेले सार्वजनिक कंपन्या, विमानतळे, बंदरे विकत आहेत. त्याच सरकारी पोर्टवर हजारो टन कोकेन, गांजा देशात उतरत आहे. देशभरातील राज्यात नशा जन्य पदार्थाने थैमान घातले आहे.

Local ad 1