...

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची घोषणा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची महत्वाची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहनही केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. (Modi announces repeal of three anti-farmer laws)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, “आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो”, असे म्हटले आहे. (Modi announces repeal of three anti-farmer laws)

प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमांतून चर्चा सुरू राहिली. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. (Modi announces repeal of three anti-farmer laws)

या निर्णयानंतर आता दुसरी मागणी

‘केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे (Repeal Three Farm Laws) मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. भारतीय किसान सभा या शेतकरी संघटनेनेही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटाने लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम. आता केंद्र सरकारने पिकांना आधारभावाचे संरक्षण देणारा कायदा करावा,’ अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

Local ad 1