...

बेकायदा रासायनिक ताडी विकणाऱ्या टोळीवर मोक्का ; पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहिली कारवाई

पुणे Pune crime : पुणे शहर आणि जिल्ह्यात ताडी विक्रीला बंदी आहे. परंतु मुंढवा परिसरात बेकायदेशिररित्या रासायनिक विषारी ताडी विक्री केली जात होती. यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली., मात्र, आरोपींनी ताडी विक्री सुरूच ठेवली. याप्रकरणी कायद्यातील तरतुदी प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्याला आता मान्यता मिळाली असून, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली. (Mocca attack on gang selling illegal chemical palms; State Excise Department’s first action in the state) 

 

टोळी प्रमुख प्रल्हाद उर्फ परेश रंगनाथ भंडारी (रा. पीडीसी बँकेसमोर, केशवनगर, मुंढवा), सुनिल गंगाराम बनसोडे (20, रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे), शहारूख युसुफ मन्सुरी (25, रा. इंदिरानगर वॉर्ड, लोणी-काळभोर) आणि त्यांचा फरारी साथीदार निलेश विलास बांगर यांच्यावर मोक्काअंतर्गत करण्यात आली आहे. आरोपींवर बेकायदा ताडी विक्री आणि त्यासाठी आवश्यक रसायन बालगळ्याचे समोर आले आहे. ताडी अथवा गावठी दारू आढळुन आल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तसेच यापुढे हा गुन्हा करणार नाही, असा बाँड लिहित स्वरूपात घेतला जातो. त्यानंतरही गुन्हे केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. (Mocca attack on gang selling illegal chemical palms; State Excise Department’s first action in the state)

 

उत्पादन शुल्क विभागाने मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्याची चौकशी करून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आरोपींच्या मोक्क्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh gupta police camishnar in pune city)
सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (dr ravindra shisve) अपर पोलिस आयुक्त नामेदव चव्हाण गुन्हे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काची कारवाई करण्यात आली.

 

असा उघडकीस आला गुन्हा

लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अदित्य कुशन वर्कसच्या बाजुला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनिल बनसोडे याच्या ताब्यातून 265 लिटर रासायनीक विषारी ताडी व ताडी बनविण्याचे साहितय जप्त करण्यात आले होते. (Mocca attack on gang selling illegal chemical palms; State Excise Department’s first action in the state)

 

होलसेलरच सापडला तावडीत

अवैध ताडी विक्रीचा व्यावसाय शाहरूख मन्सुरी याचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. तसेच त्यांना हे रसायन टोळी प्रमुख प्रल्हाद भंडारी आणि निलेश बांगर यांनी होलसेल भावा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणून त्यांच्यावर दारूबंदी अधिनियनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रासायनिक ताडी बनविण्याचे विषारी साहित्य मानवी शरिरावर घातक परिणाम करणारे पदार्थ क्लोरलहाईड्रेड, सॅक्रीन, मड्डी पावडर, यीस्ट इत्यादी साहित्य हे निलेश बांगर याच्याकडून होलसेल भावात खरेदी करत होते. नंतर भंडारी हा पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी बेकायदेशिररित्या अवैध ताडी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. भंडारीवर यासारखेच दहा गुन्हे दाखल आहेत. बांगर याच्यावर शहर आणि जिल्ह्यात सात गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

Local ad 1