...

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मोर्चा आता मराठवाड्याकडे (MNS)

पुणे : नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता महाराष्ट्र नव निर्माण (MNS) सेनेचेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला मोर्चा आता मराठवाड्याकडे वळवणार आहेत. (MNS chief Raj Thackeray will interact with party workers in Marathwada)  त्यादृष्टीने मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

 

मनसेच्या (MNS) पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात  (At Pune City Central Office) शुक्रवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. (Order to contest the forthcoming Zilla Parishad, Panchayat Samiti, Nagar Parishad elections with full force)

 

दरम्यान, ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी  पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते.  या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी  राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता.

 

राजकारणात जर-तर महत्व नाही

भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘कृष्णकुंज’वर मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. (MNS chief raj thackeray and bjp maharashtra president chandrakant patil meet) पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात महाविकास आघाडीला भाजप आणि मनसे युतीचा पर्याय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीबाबत या भेटीत चर्चा नाही. मला वाटते महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावे यावर बंधणे नाहीत. राजकारणात जर आणि तरच्या मुद्द्याला स्थान नसते. परप्रांतियांबद्दल त्यांच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका आणि आमचे हिंदुत्व हा समान धागा आहे. मात्र, अद्यापही दुसरा जो मुद्दा आहे त्याचे निराकरण होत नाही तोवर जर तरला काही महत्व नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Local ad 1